टवाळा आवडे….

या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रात फक्त माणसाला मिळालेल्या देणग्या ज्या आहेत त्यात हास्य ही फार मोठी आणि महत्त्वाची देणगी मिळालेली आहे. सुखदायक अशी एखादी गोष्ट घडली की माणसाच्या चेहर्‍यावरचं हास्य फुलते. तसेच एखाद्या विनोदाने देखील माणसं खदाखदा हसू लागतात. विनोद आपल्याला रोजच्या ताणतणावातून मुक्त करू शकतो हा माणसाला लागलेल्या शोधांपैकी महत्वाचा शोध म्हणला पाहिजे. तणावपूर्ण वातावरण एखाद्याला छोट्या विनोदाने ही बदलता येते अशी जबरदस्त ताकद विनोदात दडलेली आहे. समर्थ म्हणून गेले आहेत ’टवाळा आवडे विनोद’. असे असले तरी ‘मुर्खाची लक्षणे’ लिहिणाऱ्या समर्थांनाही विनोदाचे वावडे नसावे. आजही आपण काही ताणात असलो की पुलंची पुस्तक वाचतो. त्यातला निखळ विनोद तुम्हाला ताण विसरायलाच लावतो. पुलंची एक तर्‍हा तर अत्र्यांचा विनोद टोकदार. तोही तुम्हाला हसायला लावतो. विनोदाचे ही किती प्रकार. नाटकात येणारा विनोद वेगळा, चित्रपटांमधे येणारा वेगळा, विनोदी पुस्तकातील विनोदांचेही कितीतरी प्रकार. श्रेष्ठ इंग्रजी लेखक आणि नाटककार शेक्सपिअर यालाही विनोदी नाटक लिहिण्याचा मोह आवरला नाही. The Comedy of Errors नावानी लिहिलेले नाटक अतिशय गाजले. गुलझारजींसारख्या संवेदनशील दिग्दर्शकाला ही या विषयावर ’अंगूर’ नावाचा चित्रपट करावासा वाटला. खरं तर ही यादी खूप लांबवता येईल. पण एक मात्र खरे आहे ते म्हणजे विनोदाने मानवाचे जीवन सुसह्य बनवले यात मात्र शंका नाही.

अभिजात संस्कृत नाटकांमधले विदुषक हे एक महत्वाचे पात्र असते. गंभीर नाटकातला तणाव कमी करण्याबरोबरच विदुषक हा कधी खलनायक, कधी नायकाचा मित्र, कधी राजाची भलावण करणारा अशा वेगवेगळ्या भूमिकेतून दिसतो. विदुषक म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सर्कशीतला विदुषक येतो. रंगीबेरंगी कपडे घातलेला. नाकावर लाल चेंडू लावलेला. कधी बुटका, कधी कुबडा तर कधी लंबूटांग सर्कशीतल्या चित्तथरारक कसरतीमध्ये थोडा रिलिफ निर्माण करणारं हे महत्वाचं पात्र.

आज ज्या विनोदावर लिहिणार आहे तो थोडा वेगळा आहे. सर्कस मधल्या विदुषकांच्या हातात एक लाकडी पट्टी असे. जी तो जोरात दुसर्‍या विदुषकाच्या ढुंगणावर मारत असे आणि त्यातून मोठा आवाज येत असे. या पट्टीला Slapstick असे म्हणले जाते. त्याने मारताना येणारा आवाजही मजेदार असतो. याने मार खाणार्‍याला फारसे लागत नाही पण त्याच्या मजेदार आवाजाने आणि मार खाणार्‍याच्या अभिनयाने विनोदाची निर्मिती होते.

या स्लॅपस्टीकचा वापर पहिल्यांदा १६ व्या शतकात इटली मधील commedia dell’arte या नाटकात केला गेला. या नाटकातील पात्र वेगवेगळे हावभाव, हालचाली करून भरपूर विनोदाची निर्मिती करत. त्यातच या स्लॅपस्टीकचा वापर केला गेला. Punch and Judy Show नावाच्या बाहुल्यांच्या खेळात पंच या पात्राच्या हातात स्लॅपस्टीक असलेली पोस्टर्स या खेळाच्या आधी सगळीकडे लावली जात. स्लॅपस्टीकनी मारामारी करणारी पात्र असलेले हे खेळ युरोपमधे अतिशय प्रसिद्ध झाले.

१९ व्या शतकाच्या अखेरीस मुव्ही कॅमेराचा शोध लागला आणि विनोदवीरांच्या हाती एक वेगळे साधन आले. २० व्या शतकाच्या सुरुवातीस वेगळ्या प्रकारची विनोदनिर्मिती करणारी एक वेगळी पद्धतीचा वापर चालू झाला आणि आजही अशा प्रकारच्या विनोदाने ठासून भरलेले चित्रपट दे मार चालतात.

स्लॅपस्टीक कॉमेडी या नावाने एक नवीन विनोदनिर्मिती करणारी पद्धत २० व्या शतकाच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागली. स्लॅपस्टीक कॉमेडी हा शारिरीक हालचाली, माफक हिंसाचार, मारामारी, लोकांमधे होणारा पाठलाग अशा वेगवेगळया कृतींमधून विनोदांची निर्मिती केली जाते. मुव्ही कॅमेर्‍याच्या शोधामुळे या सगळ्या हालचालींना वेग आला आणि यातून पोट धरून हसायला लावणारी विनोदाची निर्मिती व्हायला लागली. १८९० च्या दरम्यान फ्रेड कार्नो याने आपल्या मुकपटांमधे याचा वापर सुरू केला. एक माणूस पळतोय त्याच्यामागे पोलीस लागलेत आणि पळता पळता तो कोणालातरी पाडतोय, कोणालातरी धक्का लागल्याने त्याच्या हातातला रंग सांडतोय, कोणी शिडी घेऊन जाणारा धक्क्यामुळे गोल फिरतोय अशा वेगवेगळ्या करामतींमधून विनोदाची निर्मिती केली जात असे. हे वर्णन वाचल्यावर आपल्या समोर येतात ते चार्ली चॅप्लिन आणि लॉरेल हार्डी फ्रेड बरोबर त्याच्या या मुकपटांमधे चार्ली चॅप्लिन आणि लॉरेल हे त्याचे तरूण सहकारी काम करत असत. पुढे या दोघांनीही जेव्हा स्वतंत्रपणे चित्रपटांची निर्मिती चालू केली त्यात स्लॅपस्टीक कॉमेडीचा भरपूर वापर केला. त्यात किस्टोन कॉप्स आणि चार्ली चॅप्लिन हे दोघे One man Slapstick Comedy master समजले जातात. पुढील काळात या विनोदी प्रकाराचा वापर चित्रपटांबरोबरच Tom and Jerry सारख्या कार्टून फिल्म्समध्ये केला गेला आहे.

For heaven’s sake या चित्रफितीतील स्लॅपस्टीक कॉमेडी

आता या स्लॅपस्टीक कॉमेडी मधल्या एका आणखी विनोदी प्रकाराबद्दल ही थोडी माहिती. Pieing अर्थात केकफेक हाही स्लॅपस्टीक कॉमेडी मधलाच एक प्रकार. केक फेकून करण्यात येणार्‍या मारामारीमुळे आणि ज्याच्या तोंडावर केक मारला जात असे त्याच्या विनोदी चेहेर्‍यामुळे विनोदाची निर्मिती होत असे. तोंडाला केक फासण्याची प्रथा अनेक प्रदेशामध्ये सापडते. यातूनच विनोदाची निर्मिती करण्याची कल्पना फ्रेड कार्नोला आली आणि त्याने आपल्या Pie in the Face या विनोदी नाटकात पहिल्यांदा केला. त्यानंतर या केकफेकीची लाटच आली. चार्ली चॅप्लिनने आपल्या Behind the Screen या १९१६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात केकफेक वापरली. १९२७ साली प्रदर्शित झालेल्या Battle of Century या लॉरेल हार्डीच्या चित्रपटात केकफेक दाखवण्यात आली होती. या केकफेकीत तब्बल ३००० केक वापरण्यात आले होते. १९३० साली प्रदर्शित झालेल्या Our Gang च्या Shivering Shakespeare या चित्रपटात दाखवलेल्या संपूर्ण चित्रपटगृहात प्रेक्षक केकने मारामारी करतानाचा प्रसंग दाखवला आहे. १९६५ साली प्रदर्शित झालेला The Great Race या चित्रपटात आजवरची सर्वात मोठी केकफेक दाखवण्यात आली आहे. यासाठी ४००० केकचा वापर करण्यात आला.

केकफेक ही जशी विनोदाची निर्मिती करण्यासाठी वापरली गेली तशीच ती समोरच्या माणसाला इजा न करता त्याची मानखंडना करण्यासाठीही वापरली गेली आहे. १९७० साली टॉम फोरकेड या High Times या मासिकाच्या संस्थापकाने ओट्टो लार्सन यांच्या तोंडावर केक फासला. लार्सन हे अश्लीलता आणि पोर्नोग्राफीवर आळा घालण्यासाठीच्या समितीचे सदस्य होते. त्यानंतर अनेक राजकीय कृतीमधे याचा वापर करण्यात आला. सगळ्या जगाला परिचित असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस‍ यांनाही १९९८ साली बेल्जियम मधे केक फासण्यात आला. त्यानंतर यावर एक Computer Game ही करण्यात आला. तर ही छोटी माहिती एका विनोदी केकफेकीची

हिंदी चित्रपटांमधेही स्लॅपस्टिक कॉमेडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. किशोर कुमार, मेहमुद सारखे विनोदवीर अशा प्रकारची विनोदनिर्मिती करत. अगदी अलिकडची उदाहरणं द्यायची म्हणलं तर हेराफेरी, हाऊसफुल, भागमभाग असे अनेक चित्रपट स्लॅपस्टिक कॉमेडी वापरून करण्यात आले आहेत.

एकंदर काय मानवाचे जीवन सुसह्य करण्यात विनोदाचा मोठा वाटा आहे.

कौस्तुभ मुद़्गल

One thought on “टवाळा आवडे….

Add yours

  1. Excellent. I was not aware of slapstick, but because of kaustubh’s lucid article, now I have recollected the sound.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: